Headlines

🛑 आमदार अमोल जावळेंची खेळी यशस्वी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का.

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. रावेरचे माजी आमदार अरुण पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या रणनीतीमुळे हा प्रवेश महत्त्वाचा ठरला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे….

Read Full News
🛑 युट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत नाही, ही बातमी वाचा मिळतील लाखो व्ह्यूज...

🛑 युट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत नाही, या Step फॉलो करालाखो व्ह्यूज…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – तुमचे युट्यूब चॅनल सुरू करून बरेच दिवस झाले अनेक व्हिडिओ अपलोड करून देखील त्याला चांगले व्ह्यूज येत नाही. त्यावर एक सोपा उपाय आजच्या या लेखात आम्ही सांगणार आहोत. युट्यूब चॅनलचे SEO (Search Engine Optimization) म्हणजे तुमच्या व्हिडिओ आणि चॅनलला असे ऑप्टिमाइझ करणे की तो YouTube आणि Google दोन्ही ठिकाणी जास्तीत…

Read Full News

🛑पारोळा-भडगाव रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शेतकरी संघटना आक्रमक…

हॅलो जनता न्यूज, पारोळा प्रतिनिधी (७): पारोळा ते भडगाव या रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम सुरू असून या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती पुढे आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या गटारी बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी शेतामध्ये साचत आहे. परिणामी कापूस पिके तसेच शेडनेटमधील भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना जाणून घेण्यासाठी…

Read Full News

🛑 पाचोऱ्यात ईद मिलाद उत्साहात साजरी : महाविकास आघाडीकडून अनोखे स्वागत

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा शहरात ईद मिलाद-उन-नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात व ऐक्याचे दर्शन घडवत साजरा करण्यात आला. पाचोरा शहरातील प्रमुख मार्गावरून मुस्लिम बांधवांनी आज दिमाखदार मिरवणूक काढली. या मिरवणुकीत विविध सामाजिक, धार्मिक संघटनांनी सहभाग घेतला. मिरवणुकीचा मार्ग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गेला असता महाविकास आघाडीच्या वतीने फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून ऐक्य व…

Read Full News

🌾 शेतात सोलर पंप लावायचा आहे, लगेच करा अर्ज…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कायमस्वरूपी आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “मागेल त्याला सोलर पंप योजना” सुरू केली आहे. शेतकऱ्यांना डिझेल पंपाचा खर्च टाळता यावा आणि विजेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे शेतीला होणारे नुकसान थांबावे, यासाठी या योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोलर पंप योजनेचे उद्दिष्ट…  शेतीला सिंचनासाठी स्वस्त, स्वच्छ आणि शाश्वत…

Read Full News

पाचोऱ्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, आमदार किशोर पाटील यांचे बाप्पाला साकडे.

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात यंदाच्या गणेशोत्सवात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे चिरंजीव सुमित किशोर पाटील यांनी उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या प्रतिकृतीचा अत्यंत देखणा व आकर्षक देखावा उभारला होता. दरवर्षी वेगवेगळ्या नामांकित तीर्थक्षेत्रांचे देखावे तयार करण्याची परंपरा असल्याने पाचोऱ्यातील गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. या देखाव्याला शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने…

Read Full News
यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

हॅलो जनता न्यूज, यावल (प्रतिनिधी) : यावल शहरातील बाबुजीपुरा भागात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षक मजीद खान यांचा सहा वर्षीय मुलगा ५ सप्टेंबर रोजी इदच्या दिवशी सायंकाळपासून बेपत्ता झाला होता. मुलगा हरवल्याचे लक्षात येताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल करून जनतेची मदत घेण्यात…

Read Full News
अवैध वाळू वाहतूक

अवैध वाळू वाहतूक : डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; चालक पोलिसांच्या ताब्यात

जामनेर प्रतिनिधी दि . ६ – जामनेर तालुक्यातील नेरी येथे बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात गजानन अरुण पाटील (वय ३०, रा. नेरी दिगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव डंपरखाली चिरडल्याने हा अपघात घडला असून यामुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (क्रमांक KA 28 KK 9185) चालक आकाश भरत राजपूत…

Read Full News

💥 ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा तहसीलदारांनी नव्या दालनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. पाचोरा तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतातून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक…

Read Full News
ठाकरे सेना

💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात ठाकरेंची सेना डॅमेज कंट्रोल करणार, आगामी निवडणुकांची रणनीती ठरली….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक नुकतीच पाचोर्‍यातील शिवसेना संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांच्या अगोदर ठाकरेंची सेना घेणार भव्य मेळावा… या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या जोरावर मतदारसंघात भव्य अशा निष्ठावंत शिवसैनिकांचा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION