Headlines

🛑 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम : मुख्याधिकारी मंगेश देवरे उतरले रस्त्यावर

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी): शहरातील शिवाजी नगर परिसरातील मुख्य नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला होता. त्यामुळे अलीकडील अतिवृष्टीच्या पावसात पाणी नागरिकांच्या घरात शिरले व प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पाचोरा नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करत थेट कारवाईला सुरुवात केली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून…

Read Full News

🛑 “युवा SPARK-२०२५’ या विद्यापीठस्तरीय इनोव्हेशन स्पर्धेच्या माहितीपत्रकाचे अनावरण

हॅलो जनता न्यूज, जळगाव दि. २४ – विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना नवी दिशा व पंख देण्यासाठी कावयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील केसीआयआयएल (KCIIL) इन्क्युबेशन सेंटर तर्फे युवारंग २०२५ अंतर्गत प्रथमच आयोजित होणाऱ्या ‘युवा SPARK-२०२५’ या विद्यापीठस्तरीय इनोव्हेशन स्पर्धेच्या माहितीपत्रकाचे अनावरण कुलगुरू प्रा. विजय एल. माहेश्वरी यांच्या हस्ते आज २४ सप्टेंबर रोजी करण्यात आले….

Read Full News

🛑 नवरात्रोत्सवात गाळण गावात सप्तश्रृंगी मातेची स्थापना, छत्रपती ग्रुपचे सर्वत्र कौतुक…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (नितीन गोसावी) – तालुक्यातील गाळण गावातील तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक कार्याचा ध्यास घेत “छत्रपती ग्रुप” ची स्थापना केली आहे. या ग्रुपतर्फे यंदाच्या नवरात्रोत्सवात गावात पहिल्यांदाच भव्य स्वरूपात देवी सप्तश्रृंगी मातेची मूर्ती छत्रपती चौकात प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती ग्रुपने स्त्री शक्तीचा गौरव आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. महिलांच्या…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ₹2215 कोटी मंजूर, “या” जिल्ह्यांना मिळाली सर्वाधिक मदत

हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, त्यांच्या पिकांसह घरे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, नुकसानग्रस्तांना त्वरित मदत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण, १८ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील सुप्रीम कॉलनी चौकामध्ये आज मंगळवार, सकाळी १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत तरुणाची ओळख प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (वय १८, रा. लोंढरी, ता. जामनेर, सध्या मुक्काम एमआयडीसी परिसर, जळगाव)…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : नशिराबाद ग्रामस्थांचा स्मार्ट मीटरला तिव्र विरोध; आंदोलनाचा इशारा

हॅलो जनता न्यूज, जळगाव : नशिराबाद गावात विज वितरण महामंडळामार्फत घराघरांत स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत असून, माजी सरपंच पंकज शामकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे हा ठाम विरोध नोंदविला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश किंवा निर्णय प्रसारित झालेला…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा मोठ्या प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रकल्पाचा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. तसेच नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज मध्यरात्री 4.00 वाजता धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गिरणा प्रकल्पाचा पाण्याचा विसर्ग 7428 क्युसेक्स वरून वाढवून…

Read Full News

🚨 पाचोरा तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा/भडगाव : पाचोरा व भडगाव तालुक्यात आज पुन्हा रात्रीच्या दहाच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, नागरिक व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर शेती, घरे व जनावरांचे नुकसान झाले होते. त्यात भर म्हणून आज पुन्हा सुरू झालेल्या पावसाने हाहाकार उडाला…

Read Full News

🛑पाचोरा : नुकत्याच लोकार्पण झालेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पाण्यात, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नव्याने लोकार्पण झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पाण्याखाली गेले. काही दिवसांपूर्वीच या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, मुसळधार पावसात कार्यालय परिसराची विदारक परिस्थिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यालयाचे भव्य लोकार्पण करण्यात आले असून या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींसह पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती….

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा ढगफुटी, शेत पाहायला गेलेल्या शेतकऱ्याचा नाल्यात वाहून मृत्यू

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (जि. जळगाव) : गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले असताना रविवारी मध्यरात्री व सोमवारी सकाळी पाचोऱ्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामुळे नदी-नाल्यांना अचानक पूर आला असून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, पाचोरा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION