हॅलो राजकारण

🛑 आमदार अमोल जावळेंची खेळी यशस्वी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का.

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. रावेरचे माजी आमदार अरुण पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या रणनीतीमुळे हा प्रवेश महत्त्वाचा ठरला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात अरुण पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, आमदार अमोल जावळे यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार अमोल जावळे
🛑 आमदार अमोल जावळेंची खेळी यशस्वी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का.

भाजप–महायुती सरकारच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन माजी आमदार पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रवेश सोहळ्यात रावेर तालुक्यातील विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

आमदार अमोल जावळे यांचा नवप्रवेशित कार्यकर्त्यांशी संवाद..

या वेळी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे पक्षात मनापासून स्वागत करण्यात आले. आमदार अमोल जावळे यांनी सर्व नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजपच्या संघटनेत सक्रिय राहण्याचे आवाहन केले. या घडामोडींमुळे रावेर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा मोठा फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑 युट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत नाही, या Step फॉलो करालाखो व्ह्यूज…

🛑पारोळा-भडगाव रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शेतकरी संघटना आक्रमक…

🛑 पाचोऱ्यात ईद मिलाद उत्साहात साजरी : महाविकास आघाडीकडून अनोखे स्वागत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button