Jalgaon : मनपा भंगार चोरी प्रकरणात मोठी अपडेट, 26 डिसेंबरला सुनावणी…
हॅलो जनता, जळगाव : Jalgaon
महापालिकेची जुनी लाईन चोरी प्रकरण सध्या जळगावात चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात फरार घोषित करण्यात आलेले संशयित आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी अटकपूर्व जामिनासाठी जळगाव न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी सुनावणी मंगळवारी होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही महत्त्वाची सुनावणी २६ डिसेंबर रोजी होणार आहे. महाजन यांच्या अटकपूर्व जामिनावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jalgaon : जळगाव मनपा पाईपलाईन चोरी प्रकरण
जळगाव महानगरपालिकेच्या जुन्या पाईपलाईन चोरी प्रकरणात तीन ठिकाणी विविध चोरीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे फरार असून, त्यांनी ५ डिसेंबर रोजी जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
महाजन यांच्या जामिनावर सुनावणी आधी १४ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र, सरकार पक्षाकडून मुदत मागण्यात आल्यामुळे ती १७ डिसेंबर रोजी ठेवली होती. आज न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात सुनावणी अपेक्षित होती. मात्र, काही कारणांमुळे पुन्हा सुनावणी २६ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा तर संशयित आरोपीतर्फे अॅड सागर चित्रे व अॅड. जेनुद्दीन शेख हे कामकाज पाहत आहे.
Jalgaon : पुन्हा एकदा ट्रॅप : तीन लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात….
Jamner Crime : जामनेर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांचा धाक संपला…