⁠हॅलो क्राईम

Jalgaon : पुन्हा एकदा ट्रॅप : तीन लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात….

हॅलो जनता न्युज, जळगाव… Jalagon 

महावितरण कक्ष कार्यालय पाडळसा तालुका यावल येथील सावदा विभागाच्या सहाय्यक महिला अभियंत्या,लाईनमन व तंत्रज्ञ यांनी वीज मीटर फॉल्टी असल्याचे भासवून सकारात्मक अहवाल देण्याच्या मोबदल्यात २० व १५ हजार रुपयांची लाच मागुन ४ हजाराची लाच घेतल्या प्रकरणी जळगाव (Jalgaon) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

यातील तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक असून त्यांच्या हॉटेलवर लावलेले जुने मीटर काढून नवीन मीटर लावून तक्रारदार यांनी जुन्या मीटरमध्ये फॉल्ट केला आहे असे भासवून तक्रारदार यांच्यावतीने सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात यातील सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे,लाईनमन संतोष सुकदेव इंगळे, वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम २० हजार, १५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४ हजार रुपये लाच रक्कम लाईनमन संतोष सुकदेव इंगळे, यांनी स्वीकारली म्हणून फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पो.ना.किशोर महाजन राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Devendra Fadnavis : विरोधकांनी जनतेने दिलेला कौल स्वीकारा त्यांचा अपमान करू नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस….

Jamner Crime : जामनेर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांचा धाक संपला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button