हॅलो राजकारण

Jalgaon Loksabha: महायुतीच्या प्रचाराला सूरवात, चाळीसगाव शहराचे ग्रामदैवत आनंदा माता मंदिरात प्रचाराचे नारळ वाढले

हॅलो जनता प्रतिनिधी | महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या (Jalgaon Loksabha) अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांचा प्रचार शुभारंभ करण्यासाठी आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर चाळीसगाव शहराचे ग्रामदैवत आनंदा माता मंदिर येथे प्रचार नारळ वाढविण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासप, एकलव्य संघटना, मनसे, रयत क्रांती महायुतीचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बाजारपेठ, सदर बाजार परिसरातील व्यावसायिक, नागरिक यांच्या भेटी घेऊन त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या १३ मे रोजी कमळ या चिन्हावर मत देण्याचे आवाहन केले. या प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. विरोधकांकडे सध्या कुठलाही अजेंडा नसून चाळीसगाव शहरासाठी आपण काय केले हे त्यांना सांगता येत नाहीये. ते विकासाचे व्हिजन मांडत नसून केवळ आणि केवळ मोदींचा विकास रथ कसा रोखता येईल हेच त्यांचे लक्ष असल्याची टीका यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे.

तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील चाळीसगाव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असणारे चाळीसगाव शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर दिशा मिळाली आहे. चाळीसगाव शहरातुन गेलेला जळगाव – चांदवड हा सिमेंट काँक्रीट महामार्ग, अमृत भारत योजनेतून अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त रेल्वे स्टेशन, चाळीसगाव-धुळे रेल्वे विद्युतीकरण, अमृत योजनेतून प्रस्तावित १५० कोटींची गिरणा पाणीपुरवठा योजना, हॉटेल दयानंद जवळील पुलाचे सुरू असलेले बांधकाम व घाट रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या दुकानदारांना पीएम स्वनिधी योजनेचे कवच, आदी अनेक विकासकामे सांगता येतील जी केवळ मोदींजींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून विकास झाला असल्याने जास्तीत मतांनी स्मिता वाघ यांना निवडून द्यावे असा निर्धार करण्यात आला.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon Company Fire : केमिकल कंपनीच्या आगीत 20 जण जखमी तर 1 कामगाराचा मृत्यू

MVA Jalgaon : पाचोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी, आजच्या बैठकीला काँग्रेस अनूपस्थित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button