MVA Karan Pawar : केंद्र सरकारच्या फसव्या योजनांमुळे सर्वांचे मोठे नुकसान, महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांची टीका
हॅलो जनता (पाचोरा) – व्यापारी असो किंवा शेतकरी यांच्यासाठी एकही नवीन योजना या सरकारने आणली नाही. त्या काळात घरकुल योजनेत मिळणारे अनुदान आजही तितकेच आहे. शेतकऱ्यांना ४ हजार देवून ४० हजार काढून घ्यायचे, अशी यांची मानसिकता आहे. आता यांची चलाखी ओळखण्याची गरज आहे, नाही तर असे सरकार दिले म्हणून येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील (MVA Karan Pawar) यांनी केले.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश पटवारी यांच्या अध्यक्षेखाली गुरुवार, दि.२ रोजी पाचोरा येथे व्यापारी बांधवांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीष पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, पिटीसीचे चेअरमन संजय वाघ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, संजय वाघ, सचिन येवले, विकास पाटील आदी उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे आणि स्व. आर. ओ. तात्या पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
MVA Karan Pawar : करणदादा पाटील यांना विजयी करून परिवर्तनाच्या नांदित सहभागी व्हा
मेळाव्यात बोलतांना माजी पालकमंत्री डॉ. सतीष पाटील यांनी, महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना विजयी करून परिवर्तनाच्या नांदित सहभागी व्हा, असे आवाहन केले. मेळाव्यात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, पिटीसीचे चेअरमन संजय वाघ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, जगदीश पटवारी आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याचे प्रास्तविक नंदू सोनार यांनी तर सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले. आभार भरत खंडेलवाल यांनी मानले.
Eknath Khadse : एकनाथ खडसे रक्षा खडसेंच्या प्रचारात सक्रिय, वरिष्ठांकडून प्रवेशाची तारीख निश्चित