Jalgaon Loksabha : जळगाव ग्रामीण मतदारसंघ आम्ही अबाधित ठेवणार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आजपासून प्रचारात सक्रिय
हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) मतदारसंघात महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मतदार संघातील महा युतीच्या उमेदवार स्मिता वाघ या आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात प्रचार करत असून यावेळी मंत्री गुलाबराव पाटील देखील त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत आहेत. यावेळी धरणगाव तालुक्यातील पाळधी या गावात प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
Jalgaon Loksabha : जळगाव ग्रामीण मतदार संघातून आम्ही फर्स्ट क्लास मध्ये पास होणार
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा आमचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधकांकडून कितीही मोठा प्रचार सुरू असला तरी या मतदारसंघाचा इतिहास आहे. या ठिकाणी आम्हीच फर्स्ट क्लास मध्ये पास होणार असल्याचे देखील गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
Eknath Khadse : एकनाथ खडसे रक्षा खडसेंच्या प्रचारात सक्रिय, वरिष्ठांकडून प्रवेशाची तारीख निश्चित