⁠हॅलो क्राईम

Chhattisgarh : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेत नक्षलवाद्यांचा पराभव: १ कोटी बक्षीस असलेला नेता ठार

12 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी घातले कंठस्नान

हॅलो जनता न्युज, गडचिरोली :

महाराष्ट्र, छत्तीसगड (Chhattisgarh) आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून नक्षलवाद्यांना पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ यांच्याकडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन ताणलेला आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्हा आणि इतर नक्षल प्रभावित भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान घनदाट जंगलात चकमक झाली, ज्यात 12 नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलांनी कंठस्नान घातला. बिजापूर, सुकमा आणि तेलंगणा सीमेसह इतर ठिकाणी नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश सीमावर्ती भागातही नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांनी राष्ट्रविरोधी नक्षलवादी मोहिमेचे कंबरडे मोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आक्रमक पद्धतीने मोहीम राबवली आहे. स्थानिक पोलीस आणि खबऱ्यांच्या सहाय्याने नक्षलवादाविरोधात कडक भूमिका घेतली आहे. चकमकीच्या या घटनेत नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या रात्री एक वाजेपासून सुरू झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये छत्तीसगड (Chhattisgarh) पोलीस आणि सीआरपीएफ यांच्यासोबत इतर पोलिसांच्या मदतीने यशस्वी कारवाई केली. चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी नेता चलपती ठार झाला आहे. तो ओडीसा राज्यातील स्टेट कमिटीचा प्रमुख होता आणि जवळपास 30 वर्षे नक्षल चळवळीमध्ये सक्रिय होता. याशिवाय दोन महिलाही कॅडर नक्षलवादी ठार झाल्या. घटनास्थळावरून एसएलआर रायफल, अम्बुंश आणि ईडी स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिस आणि सीआरपीएफ यांनी एक मोठे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. गडचिरोली येथील नक्षलविरोधी पोलीस पथक नक्षल ऑपरेशनवर तैनात आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने छत्तीसगड राज्यातील ऑपरेशनवर बारकाईने लक्ष ठेवले आहे आणि या ऑपरेशनचे सतत पाठपुरावा केला जात आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागातही ऑपरेशन सुरू करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्याचा सीन रिक्रिएट ; आरोपीच्या कृत्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी

Rohit Sharma : रोहित शर्मा रणजी स्पर्धेत 10 वर्षांनी पुनरागमन, मुंबई संघात समावेश

Thakare Gat : शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; एकनाथ पवार यांनी दिला राजीनामा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button