हॅलो राजकारण

🚨 ब्रेकिंग: जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीत तिढा कायम, राष्ट्रवादीचा इतक्या जागांचा प्रस्ताव….

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी युती निश्चित करत निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. यासाठी जळगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल प्रेसीडेंट पार्क येथे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असले, तरी जागावाटपाबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

महायुती : बैठकीला न बोलावल्याने नाराजी – संजय पवार

दरम्यान, महायुतीतील तिसरा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत चर्चा सुरू असल्याचे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. मात्र समाधानकारक जागावाटप न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढण्यावर राष्ट्रवादी अजित पवार गट ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे महायुतीचा तिसरा घटक अंतिम क्षणापर्यंत अनिश्चित राहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “आम्हालाही महायुती म्हणूनच निवडणूक लढायची आहे. मात्र भाजप-शिवसेनेच्या बैठकीला आम्हाला किंवा किमान आमच्या वरिष्ठ नेत्यांना तरी बोलावले पाहिजे होते. तसे झाले नाही, याची खंत आहे.”

महायुती : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा १२ जागांचा प्रस्ताव..

तथापि, बैठकीनंतर भाजपचे नेते मंगेश चव्हाण यांचा निरोप आला होता, अशी माहितीही संजय पवार यांनी दिली. “त्यांच्याशी चर्चा झाली असून आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी १२ जागांची मागणी करण्यात आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. युतीबाबत बोलताना संजय पवार यांनी राजकीय उपमा देत म्हटले की, “भाजप आणि शिवसेना हे सख्खे भाऊ आहेत, तर अजित पवारांचे राष्ट्रवादी हे महायुतीतील मावस भाऊ आहे. मात्र सन्मानजनक जागा मिळाल्यास आम्ही नक्कीच महायुती म्हणूनच निवडणूक लढू.”

एकीकडे भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाल्याने राजकीय चित्र स्पष्ट होत असले, तरी दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका आणि जागावाटपाचा तिढा यामुळे जळगाव महापालिका निवडणूक आणखी रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. पुढील काही दिवसांत जागावाटपावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग : नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवकाचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश, भडगावात खळबळ….

🚨जळगाव ब्रेकिंग: भाजपा ५७ च्या खाली, सेना २५ नक्की मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काय?

🚨 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवनिर्वाचित पाचोरा भडगाव नगराध्यक्षांचा सत्कार, दिला विकासाचा शब्द…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button