Pankaja Munde : पंकजा मुंडे यांची विधान परिषदेच्या आमदार पदी निवड, जळगावात समर्थकांकडून जल्लोष…
हॅलो जनता, जळगाव – लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची विधान परिषद आमदार पदी वर्णी लागल्याबद्दल जळगावातील मेहरून येथे जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना व समस्त लाड वंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान मेहरुण यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला.
मुंडे समर्थक नगरसेवक प्रशांत नाईक, ज्येष्ठ समाज बांधव दामोदर पाटील, प्रकाश घुगे, सचिन ईखे, अनिल घुगे, राहुल सानप, तेजस वाघ, गौरव घुगे, ऋषिकेश वाघ, संकेत सानप ,अमोल ढाकणे वाकडी ,किरण नाईक, भुषण लाडवंजारी ,गजानान चाटे ,योगेश नाईक ,अभय चौधरी, महेश घुगे ,देवेंद्र लाडवंजारी, विकी सानप, प्रतीक पाटील, ऋषिकेश चाटे, जयेश पाटील, प्रणव घुगे, सुमित देशमुख, मुकुंदा घुगे ,विवेक सानप, किरण शेले, निखिल वाघ, समाज बांधव उपस्थित होते.
Jalgaon : जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन