Bhadgaon : गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना एसीबीने केली अटक
हॅलो जनता न्युज, मुंबई :
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भडगाव (Bhadgaon) शहरात एक मोठी कारवाई केली असून, गावठी बनावटीच्या कट्ट्यासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुप्त बातमीदाऱ्यांच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भडगाव येथील यशवंत नगर भागात अचानक छापेमारी केली.
गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने भडगावातील (Bhadgaon) आकाश झुंबर कांबळे या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीचा एक पिस्टल जप्त करण्यात आला. अधिक तपास करतांना आकाश कांबळे ने सांगितले की, त्याने हे हत्यार कजगाव येथील शुभम भास्कर दौणे याच्याकडून घेतले होते. त्यानंतर शुभम दौणे यालाही कजगाव येथून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हा कट्टा दहशत माजविण्याच्या उद्दीष्टाने ठेवला होता, असे सांगितले आहे.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पथक सदस्य – पोउपनिरी शेखर डोमाळे, पोह प्रविण भालेराव, महेश पाटील, ईश्वर पाटील, सागर पाटील, दिपक चौधरी यांनी केली.
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Jalgaon Fraud : जळगाव शहरातील डॉक्टराची फसवणूक ; काय आहे प्रकरण ?
Shinde Gat : शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली ; तुमच्यापेक्षा तर…