गोंडगावात आमदार रोहित पवार यांची भेट ; पीडित कुटुंबाला न्यायासाठी प्रयत्नांची ग्वाही.
तीन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंब
गोंडगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे तीन वर्षांपूर्वी एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या संतापजनक घटनेला तीन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप न्याय मिळालेला नसल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रकरण सध्या फास्ट ट्रॅक न्यायालयात सुरू असले तरी निकाल प्रलंबित आहे.
आमदारांची प्रत्यक्ष भेट ; परिस्थितीचा आढावा.
घरकुल व पुनर्वसनासाठी मदतीची घोषणा
यावेळी आमदार पवार यांनी पीडित कुटुंबासाठी घराचे बांधकाम लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घटनेनंतर आरोपीच्या वाहनावर दगडफेक केल्याप्रकरणी काही तरुणांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठीही शासनपातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनाकडून संवेदनशीलतेची अपेक्षा
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी व प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करत पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
“पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या प्रकरणात झालेला विलंब अत्यंत दुर्दैवी आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.” – आमदार रोहित पवार.



