Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

🚨 ब्रेकिंग: जळगाव जिल्ह्यातील १४ वाळू घाटांसाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू

🚨 ब्रेकिंग: जळगाव जिल्ह्यातील १४ वाळू घाटांसाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या वापर व उत्खननासाठी अखेर प्रतिक्षित ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज शाखेच्या वतीने २०२५-२०२६ या वर्षासाठी १४ वाळू घाटांच्या वापर, उत्खननासाठी ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेची अधिसूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सोमवारी जारी केली. या प्रक्रियेनुसार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन…

Read Full News

🚨 पोकरा योजना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा टप्पा २) भरती प्रक्रिया सुरू!

हॅलो जनता न्यूज, मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा २ अंतर्गत अखेर पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जवळपास वर्षभरापासून ही योजना पदभरतीअभावी ठप्प होती. आता शासनाने भरतीला हिरवा कंदील दाखवल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला गती मिळण्याची शक्यता आहे. पोकरा योजना : प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढविणे आणि टिकाऊ शेती…

Read Full News

🚨आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सामान्य ज्ञान स्पर्धा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर पाटील बहुउद्देशीय संस्था, पाचोरा आणि द युनिक अकॅडमी शाखा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत व खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. ही स्पर्धा रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११…

Read Full News
🚨 जळगाव ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, अखेर महापालिकेतील "त्या" नगरसेवकांचा प्रवेश निश्चित..

🚨 जळगाव ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, अखेर महापालिकेतील “त्या” ७ नगरसेवकांचा प्रवेश निश्चित..

हॅलो जनता न्यूज, जळगाव | महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे. ठाकरे गटाशी संबंधित आठ माजी नगरसेवकांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, या प्रवेशासाठी गुरुवार, दि. ३० ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. या प्रवेश सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. महापालिकेच्या आगामी…

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग : पक्षनिष्ठांपेक्षा स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांनाच प्राधान्य द्यावे, जनतेची सर्व पक्षांकडून अपेक्षा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच पक्षांनी तयारीचा बिगुल वाजवला असून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक नेत्यांची धावपळ वाढली आहे. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारीसाठी शर्यत सुरू झाली असून अनेक इच्छुक नेते थेट वरच्या नेत्यांची भेट घेऊन तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, या शर्यतीत केवळ समाजसेवकच नव्हे,…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : गिरणा धरण, सतर्कतेचा इशारा : पाण्याचा विसर्ग वाढविला…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा धरण प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने आज, दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.00 वाजता, पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, गिरणा प्रकल्पाचा विसर्ग 9,904 क्युसेक्सवरून वाढवून 12,380 क्युसेक्स (सुमारे 350.35 क्युमेक्स) इतका करण्यात आला आहे. सध्या धरणाचे वक्रद्वार क्र. 1,…

Read Full News

💥 ब्रेकिंग :जळगाव-पाचोरा रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात, प्रवासी जखमी तर…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – जळगाव-पाचोरा मार्गावर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसरातील नागरिकांना काही काळासाठी धक्का बसला. पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातील खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एका कारचा तोल जाऊन ती थेट समोरून येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर आदळली. ही घटना पी.जे. रेल्वे गेट जवळ घडली असून, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : मुलींच्या स्वतंत्र शाळांच्या एकत्रिकरणाविरोधात तीव्र नाराजी; आमदार किशोर पाटील यांना शिक्षक पालकांचे निवेदन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा, – राज्य शासनाने दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रक क्रमांक MSC-२१०४०/३/२०२५-MSC-(SM-५) नुसार, एकाच आवारातील मुलं व मुलींच्या स्वतंत्र शाळा एकत्र करून सहशिक्षण शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिक्षक, पालकवर्ग तसेच सामाजिक कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शासनाने हा निर्णय तात्काळ पुनर्विचारात घ्यावा किंवा स्थगिती द्यावी,…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव नगराध्यक्षपदासाठी भाजपाचा उमेदवार ठरला? यांच्या नावाची चर्चा….

हॅलो जनता न्यूज, भडगाव : भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत उमेदवारीसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. भडगाव नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला राखीव आरक्षण निघाल्याने निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सुशीलाताई शांताराम पाटील यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अत्यंत जास्त असल्याचे समजते….

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग : कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही — आमदार किशोर पाटील

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा शहरातील शिवसेना (शिंदे गट) कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शाखा प्रमुख, नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION