हॅलो राजकारणहॅलो सामाजिक

पाचोऱ्यात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; भाजप नगरसेवकाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात नागरिकांना गढूळ व दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप करत या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नगरसेवक राहुल गायकवाड यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन देत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पाचोरा शहरात पाणी शुद्धीकरण (फिल्ट्रेशन) प्रकल्प नसल्यामुळे केटी वेअरमधून थेट पाण्याचा उपसा करून तो पाण्याच्या टाकीत साठवला जातो व नंतर नळाद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पुरवठा केला जातो. मात्र सध्या उन्हाळ्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू असून, त्याचबरोबर परिसरात रेती माफियाकडून यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पाचोरा : अवैध रेती उपशामुळे गढूळ पाणी, राहुल गायकवाड यांचा आरोप

या अवैध रेती उपशामुळे केटी वेअरमधील पाणी पूर्णपणे मातीयुक्त व गढूळ झाले असून हेच दूषित पाणी नागरिकांना पुरवठा होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. परिणामी शहरातील विशेषतः जुन्या पाचोरा भागातील मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अशुद्ध पाणी पिण्यास भाग पाडले जात असून जलजन्य आजारांचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

पाचोऱ्यात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर;
पाचोऱ्यात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर;

पाचोरा शहरातील काही उच्चभ्रू वस्त्यांमध्ये आरओ यंत्रणा व पाण्याचा साठा करण्याची सुविधा असल्यामुळे ते नागरिक काही प्रमाणात शुद्ध पाणी वापरू शकतात. मात्र सर्वसामान्य व गरीब नागरिकांकडे अशा सुविधा नसल्यामुळे त्यांना थेट गढूळ पाणीच वापरावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

दरम्यान, पाचोरा शहरात तात्काळ पाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू करावा, केटी वेअर परिसरातील अवैध रेती उपसा त्वरित बंद करावा तसेच महसूल, पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी राहुल गायकवाड यांनी केली आहे.

तसेच परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन भरारी पथक स्थापन करून प्रत्यक्ष पाहणी करावी व नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

भडगाव उपबाजारात शेतमालाच्या लिलावाला सुरुवात ; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

चोपडा ब्रेकिंग : गो तस्करांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अन्यथा, रोहित निकमांचा इशारा..

जळगावात भाजपकडून विधानपरिषदेसाठी अमोल शिंदे यांचे नाव चर्चेत, लवकरच मोठी बातमी मिळणार…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button