अमळनेर : क्रीडामंत्री पद मिळणार ही वल्गना आहे…
“आमदार अनिल पाटील यांना क्रीडामंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा केवळ वल्गना आहेत. या चर्चा त्यांनीच सुरू केल्या आहेत. वरचे लोक हुशार आहेत. उत्तर महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचा एकही नगराध्यक्ष निवडून आलेला नाही. अशा परिस्थितीत कोणत्या कामगिरीच्या जोरावर त्यांना मंत्रिपद देण्यात येईल?” अशी बोचरी टीका चौधरी यांनी केली.

चौधरी पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाची ताकद सिद्ध करण्यात अपयश आले असताना मंत्रिपदाच्या चर्चा करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे. त्यामुळे अनिल पाटील यांना मंत्री करण्याच्या चर्चा केवळ राजकीय अफवा असून प्रत्यक्षात तसे काही होण्याची शक्यता नाही, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार गटातील नेतृत्वाकडून अद्याप कोणतेही अधिकृत संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळातील रिक्त जागेबाबत सध्या तरी केवळ तर्क-वितर्क आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, प्रत्यक्ष निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
आंचळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
जळगाव मनपा : प्रभाग क्रमांक ७ मधून महेश वर्मा यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी…
जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ मध्ये अश्फाक खाटीक यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा
