Headlines

🚨 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिका निवडणुकीत “या” दोन प्रभागात आज मतदान, उद्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज दोन प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून शहराचे राजकीय तापमान पुन्हा एकदा चढले आहे. प्रभाग क्रमांक ११ अ आणि १२ ब या दोन जागांसाठी आज मतदान होत असून त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.

दि. २ डिसेंबर रोजी पाचोरा नगरपालिकेच्या २६ नगरसेवक पदांसह १ नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. ही प्रक्रिया एकूणच सुरळीत पार पडली होती. न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रभाग क्रमांक ११ अ आणि १२ ब मधील उमेदवारांची मतदान प्रक्रिया त्या दिवशी होऊ शकली नव्हती. त्यामुळे आज स्वतंत्रपणे या दोन प्रभागांसाठी मतदान घेण्यात येत आहे.

आजच्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था तसेच निवडणूक साहित्याची पूर्तता करण्यात आली असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

पाचोरा : उद्या निकालाकडे सर्वांचे लक्ष…

दरम्यान, उद्या होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाचोऱ्यात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्येच थेट सामना रंगला आहे. विशेषतः भाजप विरुद्ध शिवसेना अशी स्पष्ट लढत पाहायला मिळत असल्याने ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

या निवडणुकीचा निकाल केवळ नगरपालिकेतील सत्तासमीकरण ठरवणारा नसून, स्थानिक राजकारणातील ताकद कोणाच्या बाजूने आहे हेही स्पष्ट करणारा ठरणार आहे. त्यामुळे मतदार आज कोणाला कौल देतात आणि उद्या निकालात जनतेचा कौल कुणाच्या बाजूने जातो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

ब्रेकिंग : नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय..

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

ब्रेकिंग : ग. स. सोसायटीची भरती प्रक्रिया एजन्सी मार्फत करावी – आमदार चंद्रकांत पाटील

4,448Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION