Headlines

🔴ब्रेकिंग : चोपडा निवडणुकीत नवे राजकीय गणित; शिंदे गट–काँग्रेस युतीच्या चर्चेला उधाण

हॅलो जनता न्यूज, चोपडा (जळगाव) – राजकारणात कुणीच कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, अशी म्हण पुन्हा एकदा खरी ठरत असल्याचे चोपडा तालुक्यात पाहायला मिळत आहे. चोपडा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनपेक्षित पण महत्त्वाचे राजकीय समीकरण तयार होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप पाटील यांच्यात एकत्र येऊन निवडणूक लढविण्याबाबत गंभीर चर्चा सुरू आहे. या चर्चेला सकारात्मक वळण मिळाले असून लवकरच या युतीवर औपचारिक शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात सध्या महा विकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये टोकाचा विरोध पाहायला मिळत असताना, चोपड्यात मात्र या राजकीय युतीच्या चर्चेमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. स्थानिक राजकारणात नवीन समीकरण तयार झाल्यास येथील निवडणुकीचे चित्र पूर्णतः बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चोपडा निवडणूक : काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर, मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता..

दरम्यान, काँग्रेस नेते संदीप पाटील यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांत व पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर उमटला आहे. पक्षांतर्गत मतभेद निर्माण होण्याची शक्यता असून काहीजण स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या युतीमागे स्थानिक स्तरावरील राजकारणातील स्वार्थसंबंध आणि विकासाच्या प्राधान्यक्रमाचा विचार महत्त्वाचा ठरला आहे. येत्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घडामोडींवर काय निर्णय घेतात, आणि काँग्रेस हायकमान यावर कोणती भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चोपड्यातील आगामी नगरपालिका निवडणूक त्यामुळे केवळ स्थानिक नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणातही निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतर महत्वाच्या बातम्या…

ब्रेकिंग: भडगाव पालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, तहसीलदारांनी दिली महत्त्वाची माहिती….

ब्रेकिंग: भडगावात परिवर्तन मेळावा, अंतर्गत गटबाजीचे भाजप नेत्यांसमोर आव्हान

ब्रेकिंग : भडगावात भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा : विविध पक्षाच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

7,285Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION