हॅलो जनता न्यूज, पाचोरा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात भारतीय जनता पक्षाच्यावतीने ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा शहरातील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या मेळाव्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीप वाघ यांनी केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होणार असून या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. नुकताच शिवसेना शिंदे गटाचा भव्य निर्धार मेळावा पाचोऱ्यात संपन्न झाला या मेळाव्याला उत्तर देण्यासाठी पाचोऱ्यात भाजप तर्फे परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचोरा : येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता – माजी आमदार दिलीप वाघ
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. नगरपालिका तसेच नगरपंचायत पहिल्या टप्प्यात, जिल्हा परिषद दुसऱ्या टप्प्यात तर महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या तिसऱ्या टप्यात पार पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पुर्वतयारी म्हणून पाचोरा शहरातील सारोळा रोड येथील समर्थ लॉन्स येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने पाचोरा शहर तसेच तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्रपणे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण तसेच जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पाचोरा : आमदारांनी केलेल्या आरोपाला मेळाव्यात उत्तर देणार…
आमदार किशोर पाटीला यांनी निर्धार मेळाव्यात दिलीप वाघ, अमोल शिंदे, वैशाली सुर्यवंशी यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांच्या टीकेला भाजपने आयोजित केलेल्या मेळाव्यातून प्रत्युत्तर दिले जाईल, असेही माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपचे अमोल शिंदे, वैशाली सुर्यवंशी, प्रताप पाटील, प्रदीप पाटील, बन्सी पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या…
🔴ब्रेकिंग : सावद्यात शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार?
🔴पाचोरा ब्रेकिंग : पाचोऱ्यात आज श्री. बालाजी महाराज रथयात्रा, रथोत्सवाची १९० वर्षाची परंपरा
