Headlines

🔴पाचोरा ब्रेकिंग : पाचोऱ्यात आज श्री. बालाजी महाराज रथयात्रा, रथोत्सवाची १९० वर्षाची परंपरा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरातील सुमारे १९० वर्षांची अखंड परंपरा लाभलेली श्री बालाजी महाराजांची रथयात्रा आज मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडणार आहे. या भव्य धार्मिक सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होत असतात.

दुपारी २ वाजता सुरू होणारी रथमिरवणूक रात्री १० वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात येणार आहे. रथ गल्ली, विठ्ठल मंदिर रोड, तलाठी कार्यालय, जामनेर रोड, महात्मा गांधी रोड मार्गे ही मिरवणूक पार पडेल. “श्री बालाजी महाराज की जय!”च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिभावाने दुमदुमून जाईल.

सुमारे ३० फूट उंच सागवानी लाकडाचा आकर्षक रथ झेंडूफुलांच्या माळा, ऊस, केळीचे खांब आणि भगवे निशाणांनी सजवला जाणार आहे. मिरवणुकीपूर्वी रथाची पूजनविधी पार पडेल, ज्याचा मान दरवर्षीप्रमाणे पाटील परिवारातील नवविवाहित जोडप्यांना दिला जातो. या रथाची देखभाल आणि आयोजनाची जबाबदारी सयाजी पाटील परिवार, पाचोरा यांच्या वतीने पार पाडली जाते. त्यांच्या परंपरेमुळे या रथाला “कोल्ह्यांचा रथ” म्हणून ओळख मिळाली आहे. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशे, लेझीम पथकं आणि मशालींचा गजर होणार असून पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणार आहेत.

गांधी चौक, जामनेर रोड आणि शिवाजी चौक परिसरात यात्रेची मोठी लगबग दिसून येईल. भाविकांकडून श्री बालाजी महाराजांना केळी व नारळाचा प्रसाद अर्पण केला जाणार आहे. पारंपरिक श्रद्धा आणि सांस्कृतिक ऐक्याचा संगम असलेला हा ऐतिहासिक उत्सव यंदाही अतिशय उत्साहात पार पडणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

ब्रेकिंग : भडगाव पोलिसांची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई, अनेक भावी नगरसेवकांचा समावेश

पाचोरा ब्रेकिंग : पाचोऱ्याच्या नगरध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर, यांना मिळणार उमेदवारी…

पाचोरा ब्रेकिंग : निर्धार मेळाव्यात शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग, भाजप ठाकरे गटाला धक्का

1,571Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION