Headlines

💥ब्रेकिंग : बोगस कॉल सेंटर प्रकरण, संशयितांच्या वकिलाचा युक्तिवाद अन् न्यायालयात काय घडले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल.के. फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर मोठा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. रविवारी पोलिसांनी कारवाई करून कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक केली. सोमवारी (दि. २९) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बोगस कॉल सेंटर प्रकरण : गुप्त माहितीवरून कारवाई

अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना शनिवारी या फार्म हाऊसवर ऑनलाईन फसवणुकीसाठी बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवारी पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा ३१ लॅपटॉप, आधुनिक कॉल सेंटरची उपकरणे, तसेच इंटरनेट सुविधा आढळून आली.

बोगस कॉल सेंटर प्रकरण : विदेशी नागरिकांना टार्गेट

पोलिस तपासात या कॉल सेंटरमधून विदेशी नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे भासवून, डेटा तपासणी किंवा अन्य आकर्षक आमिषे दाखवून परदेशी लोकांकडून पैसे उकळत होते. दोन लॅपटॉपवर थेट आर्थिक व्यवहार झाल्याचेही पोलिसांना आढळले आहे. या प्रकरणात माजी महापौर कोल्हे यांच्यासह अटक करण्यात आलेले इतर संशयित कोलकाता येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सर्वांविरोधात संघटित गुन्हेगारी कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.

सोमवारी सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय व्यक्त करून दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र, बचाव पक्षातील ॲड. सागर चित्रे, ॲड. मुकेश शिंपी आणि ॲड. अकिल इस्माईल यांनी पोलिसांच्या मागणीला जोरदार आक्षेप घेतला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्वांना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥ब्रेकिंग : जामनेरमध्ये अवैधरित्या गॅस भरताना भीषण स्फोट : एक गंभीर जखमी …

💥 ब्रेकिंग : गिरणा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू, मात्र पुलाला मध्यभागी तडा गेल्याची माहिती…

भडगाव गिरणा पूल वाहतुकीसाठी खुला पण, प्रशासनाच्या सूचना…

 

6,077Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION