हॅलो क्रीडा⁠हॅलो क्राईम

💥ब्रेकिंग : क्रिकेट विश्वात खळबळ, या भारतीय क्रिकेटरला होणार दहा वर्षाचा कारावास….

हॅलो जनता न्यूज, नवी दिल्ली :- भारतीय क्रिकेटपटू यश दयाल मोठ्या अडचणीत सापडला असून, त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आयपीसीचे हे कलम अजामीनपात्र असून, या कलमाअंतर्गत यश दयालला १० वर्षांची शिक्षादेखील होऊ शकते. या बातमीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पीडित मुलीने यश दयालवर लग्नाचे आमिष दाखवून तिचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पीडित मुलीने तिच्या आरोपांबाबत व्हॉट्सअॅप चॅट्स, व्हिडीओ कॉल्स आणि फोटोंचे स्क्रीनशॉट असे पुरावेदेखील सादर केले आहेत. त्या आधारावर पोलिस तपास करीत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, यश दयालविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पीडित मुलीने प्रथम १४ जून रोजी महिला हेल्पलाइन क्रमांक १८१ वर फोन केला होता. परंतु, तेथे कोणतीही सुनावणी न झाल्याने तिने २१ जून रोजी मुख्यमंत्री हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार केली. पीडितेने यश दयालवर लावलेल्या आरोपांची चौकशी पोलिसांनी आता सुरू केली आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर आणि तिचा जबाब कायदेशीररीत्या दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविल्यानंतरच पोलिस कारवाई सुरू करतील. यश दयालला अटकदेखील केली जाऊ शकते.

क्रिकेटर दयाल वर नेमके पीडितेचे आरोप काय?

पीडित मुलगी गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. यश दयालविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल करताना तिने सांगितले की, ती गेल्या ५ वर्षांपासून क्रिकेटपटूसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने, असाही दावा केला आहे की, यश दयालच्या कुटुंबाने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. ती वारंवार यश दयालच्या घरी येत असे. तथापि, आतापर्यंत यश दयाल किंवा त्याच्या कुटुंबाने या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता नेमके पुढे काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या….

💥ब्रेकिंग : उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांची बदली

पाचोरा पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षकपदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती, तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान…

💥 धक्कादायक : जिल्ह्यात तब्बल ८६ बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button