हॅलो राजकारण

💥 ब्रेकिंग : बोदवडकरांचा पाणी प्रश्न मिटणार, पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

हॅलो जनता न्यूज, बोदवड – येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या “पाणीपुरवठा योजना – जलकुंभ क्र. २” चा भूमिपूजन सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी महायुती परिवारातील मान्यवर, पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच बोदवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या योजनेमुळे बोदवड शहरातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार असून, तापी नदीवरून येणाऱ्या पाण्यातील गाळाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यास मोठा फायदा होईल तसेच शहरातील जीवनमान उंचावेल, असा विश्वास आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी बोदवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, तालुकाप्रमुख प्रमोद धामोडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख हितेश पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे यांच्यासह शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुती परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. बोदवड नगराध्यक्ष, नगरसेवक आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून बोदवड शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले. शहराच्या विकासासाठी ही योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, आगामी काळात आणखी अनेक विकासकामे हाती घेतली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥 ब्रेकिंग : विद्यापीठात उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

💥 ब्रेकिंग : मुक्ताईनगरातील भाविक जम्मूत अडकले, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला फोन अन्..

💥श्री. दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान, सांगवी येथे गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button