हॅलो राजकारण

Amit Shaha : “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांवर हल्लाबोल; सहकार क्षेत्रावर केली टीका”

हॅलो जनता न्युज, मालेगाव :

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांनी एकदा पुन्हा राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मालेगावमध्ये बोलत होते आणि यावेळी शरद पवार यांच्यावर कृषी आणि सहकार क्षेत्रातील कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले, “पवार साहेब, आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात. त्या काळात सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, पण त्या काळात आपण साखर कारखान्यांसाठी किंवा सहकार क्षेत्रासाठी काय केले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अमित शाह (Amit Shaha) यांनी यावेळी सांगितले की, “आमच्या सरकारने महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 46 हजार कोटी रुपये टॅक्स कमी केले आहेत.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, “मार्केटिंग नेता बनून फिरणं सोपं आहे, परंतु जमिनीवर राहून आणि मेहनत करून काम करणे महत्त्वाचे आहे.”

अमित शाह यांनी शेतकरी, सहकार आणि शेतीच्या दृष्टीने आपले विचार मांडताना लाल बहादुर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ आणि नरेंद्र मोदी यांच्या ‘जय विज्ञान’ या घोषवाक्यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “सहकाराच्या माध्यमातून शेतीमध्ये निश्चितच फायदा होतो. शेतकरी परंपरागत पद्धतीने शेती करतो, परंतु अत्याधुनिक भूमी परीक्षण प्रयोगशाळा तयार केली आहे. येथे पाण्याच्या पीए प्रमाणाची देखील तपासणी केली जाते.”

अमित शाह (Amit Shaha) यांनी शेतकऱ्यांसाठी ऑरगॅनिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. “1500 गिर गाईंमुळे विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती होईल. यामुळे ऑरगॅनिक शेतीला चालना मिळेल. तसेच, भारत सरकार ऑरगॅनिक लॅबोरेटरी सुरू करण्यासाठी मदत करेल,” असे ते म्हणाले.

त्यांनी सहकार मंत्रालयाच्या ऑरगॅनिक कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, या संस्थेचा फायदा थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जाणार आहे. “आत्मनिर्भरतेची सुंदर व्याख्या म्हणजे सहकार,” असे सांगून मोदी सरकारच्या ‘सहकार ते समृद्धी’ या संकल्पनेला त्यांनी समर्थन दिले. “या संस्थेचे 1 लाखांहून अधिक सदस्य आहेत आणि इथे 80 टक्के शेती ड्रिप सिचवोळीसाठी केली जात आहे,” असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा

Amalner : हिंगोणे येथे महिलेचा विनयभंग करत मारहाण

Nylon Manja : नायलॉन मांजा विकणाऱ्या आठ जणांविरुद्ध कारवाई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button