Headlines

💥 ब्रेकिंग : मुक्ताईनगरात दरोडा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर लूट

हॅलो जनता न्यूज, मुक्ताईनगर (जळगाव) – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या ‘रक्षा ऑटो फ्युअल’ या पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) रात्री उशिरा बंदुकीच्या धाकावर सुमारे एक लाख रुपयांची लूट करण्यात आली. या घटनेने मुक्ताईनगर शहरात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगर दरोडा : व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

मुक्ताईनगर दरोडा : घटना अशी घडली

रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप हा मुक्ताईनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी, महामार्गालगत आहे. काल (गुरुवारी) रात्री सुमारे पावणे अकराच्या सुमारास दोन दुचाकींवरून पाच अज्ञात दरोडेखोर पेट्रोल पंपावर आले. त्यांनी तेथील दोन कर्मचाऱ्यांना अचानक मारहाण केली. यापैकी एकाने कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून भीती दाखवली आणि कॅश काउंटरमधील सुमारे एक लाख रुपयांची रोकड हिसकावून नेली. दरोडेखोरांनी यावेळी सीसीटिव्ही कॅमेरे, संगणक, प्रिंटर आणि अन्य साहित्याचेही नुकसान केले. काही मिनिटांतच धुडगूस घालून ते सर्वजण बोहर्डा-बोहर्डी गावाच्या दिशेने पळून गेले.

मुक्ताईनगर दरोडा : पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक व स्थानिक तपास पथकाने परिसराचा वेढा घातला. रात्री बारा वाजता फॉरेन्सिक व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू झाला. पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फूटेज, शेजारील साक्षीदार व संशयित हालचालींचा तपास सुरू केला आहे.

मुक्ताईनगर दरोडा : कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

हा पेट्रोल पंप महामार्गालगत असल्याने दरोडेखोरांनी इतक्या निर्भयपणे बंदुकीचा धाक दाखवून लूट केली, यामुळे मुक्ताईनगरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी वर्गातही संतापाची लाट आहे. या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलीसांचे पथक विविध दिशांनी तपास करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत जितेंद्र जैन यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी!

पाचोरा : पत्रकार बंडू सोनार यांना मातृशोक

युवक महोत्सव २०२५ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशभक्तिपर ‘आनंद मठ’ नाटक पाहून विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणा…

2,879Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION