Big Breaking : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, निवडक पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक सूरू
हॅलो जनता (जळगाव) – रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चितच गुंता सुटल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आज अचानक जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून पक्षाच्या महत्वाच्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत जळगाव शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेत आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीराम पाटील यांना विजयी करण्यासंदर्भात आज चर्चा केली जाणार असून आगामी काळात लोकसभेच्या प्रचारासंदर्भात रणनीती तयार केली जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे याच्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्या अगोदर तयारीचा देखील आढावा जयंत पाटील येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी मंत्री सतीश पाटील, रावेर चे आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैयासाहेब पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत.
इतर बातम्या :
नेरी येथील जनता विद्यालयात रंगला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
Education : आर टी ई अंतर्गत आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेतात.. मग ही बातमी वाचा