⁠हॅलो शेतकरी

Jwari Farmers : ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली “ही” मागणी

हॅलो शेतकरी (चाळीसगाव) – शासनाने रब्बी हंगामातील हमीभावात खरेदीसाठी मक्याची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप ज्वारीची नोंदणी (Jwari Farmers) सुरू झालेली नाही. ज्वारीला ३१८० रुपये प्रति क्विंटल हमीभाव असताना बाजार समित्यांत २०००-२१०० रुपये क्विंटल ने ज्वारी खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे क्विंटल मागे सरासरी १००० रुपयाचे नुकसान होत आहे.

तरी मक्याबरोबरच ज्वारीची देखील नोंदणी सुरू करून ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पत्र देऊन केली आहे. पत्राची प्रत त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना देखील दिली असून शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वीच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील याबाबत निर्देश प्रशासनाला दिले होते.

Jwari Farmers : आमदार चव्हाण यांनी आपल्या पत्रात नेमकी काय मागणी केली आहे….

जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा ४८ हजार ४०३ हेक्टरवर झाला आहे. उत्पादन बाजारात मिळणारा भाव आणि हमीभावातील तफावत पाहिली तर ३१५ कोटींचा फटका एकट्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. एकीकडे दुष्काळाने शेतकरी होरपळला असताना रब्बीत कष्टाने पिकविलेल्या पिकांना हमीभावापेक्षा १ हजाराने कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन लागत आहे. तरी रब्बी हंगामातील ज्वारीची तात्काळ नोंदणी व खरेदी केंद्र सुरु करून ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :-

Raver Loksabha: कुऱ्हाकाकोडा येथे मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांसाठी उद्द्योग उभे करणार : श्रीराम पाटील

Jalgaon Fire incident: जळगाव स्फोटातील अन्य दोघांचाही मृत्यू, कंपनी मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button