नेरी येथील जनता विद्यालयात रंगला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
हॅलो जनता (प्रमोद रुले) – जामनेर तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १५ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत तर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत १९ असे एकूण ३४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये तालुक्यात विक्रमी संख्येने विद्यार्थी पात्र झाल्याने त्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील, प्रमुख अतिथी सचिव वर्षा पाटील, मुख्याध्यापक आर. ए. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. पाटील, ज्येष्ठ शिक्षक एन. बी. पाटील, एस. बी. सोनवणे, विज्ञान विभाग प्रमुख एन.एस. पाटील, शिक्षिका सुगंधा पाटील व अन्य उपस्थित होते. प्रास्ताविक पर मनोगतात मुख्याध्यापक आर. ए. पाटील यांनी परीक्षेचे स्वरूप समजावून सांगताना आर्थिक दृष्ट्या गरीब व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना संजीवनी असणारी ही परीक्षा असल्याचे सांगून पुढील वर्षी अजून मोठ्या संख्येने विद्यार्थी पात्र ठरतील असा विश्वास व्यक्त केला.
शिष्यवृत्ती परीक्षा समिती प्रमुख व्ही. इ. राऊत यांनी परीक्षेतील कागदपत्रे व त्यातील त्रुटी याविषयी सांगितले. यशस्वी विद्यार्थी गौरी उशीर, यश चोपडे, तृप्ती पाटील व धनश्री देवकर यांनी मनोगते व्यक्त केली. संस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Education : आर टी ई अंतर्गत आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेतात.. मग ही बातमी वाचा