Education : आर टी ई अंतर्गत आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेतात.. मग ही बातमी वाचा
हॅलो जनता : आरटीई अर्थात बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश दिले जातात मात्र अनेकदा पालकांकडून प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्यास प्रवेश रद्द होणार आहे. तसेच संबंधित पालकांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात काही पालकांनी शाळेशेजारील पुरावा व इतर खोटे दस्तऐवज सादर करून आपल्या पाल्याला प्रवेश मिळविल्याची बाब शिक्षण विभागाच्या विशेष मोहिमेत निदर्शनास आली होती. मागील वर्षी जवळपास तीनशेपेक्षा अधिक प्रवेश बोगस दस्तऐवजांच्या आधारे झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शिक्षण संचालनालयाने यावर्षीच्या आरटीई प्रवेशात बोगस दस्तऐवज सादर केल्यास थेट प्रवेश रद्द करण्याचे फर्मान सोडले आहे.
तसेच शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे सांगत दलालांकडून कागदपत्रे बनवू बनवली जातात यात मोठा आर्थिक व्यवहार पण होतो. मात्र शिक्षण विभागाच्या मोहिमेत त्यांच्याकडून प्राप्त झालेले प्रमाणपत्र खोटे असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. अशा प्रमाणपत्राच्या आधारे आरटीईअंतर्गत अनेकांनी प्रवेश घेतल्याचे आढळल्यानंतर शिक्षण संचालनालयाने पालकांना स्पष्ट सूचना केल्या आहेत.
Education: प्रवेशासाठी ही कागदपत्रे लागतात
- निवासाचा पुरावा
- जन्मतारखेचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- फोटो आयडी
- दिव्यांग प्रमाणपत्र
- दलालांकडून कागदपत्रे काढू नका
इतर बातम्या