मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अभिसिंग राठोड (वय २१, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुकेश हा आई-वडिलांसोबत रामदेववाडीत राहत होता. तो बांधकाम बिगारी म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
रामदेव वाडी अपघात : पायी चालत असताना अज्ञात वाहनाने ठोकले..
बुधवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८:३० वाजेच्या सुमारास मुकेश हा गावाजवळील चायनीज दुकानावरून नाश्ता करून आपल्या घराकडे पायी परतत होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मुकेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
मुकेशच्या आकस्मिक मृत्यूमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलता एक कमावता मुलगा गमावल्याने आई-वडिलांचा आधारच गेला आहे. संपूर्ण गावात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला असून, पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🔴 पाचोरा ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांची महत्वपूर्ण पत्रकार परिषद, जनतेला केले आवाहन…
🔴 पाचोरा ब्रेकिंग : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक संपन्न…
