हॅलो राजकारण

🚨 ब्रेकिंग : नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवकाचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश, भडगावात खळबळ….

हॅलो जनता न्यूज – भडगाव : नुकत्याच पार पडलेल्या भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने घवघवीत यश संपादन करत भडगाव नगरपरिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा भडगाव नगरपालिकेवर फडकला असून, शहराच्या राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवार रेखा मालचे यांची लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाली असून, त्यांच्या निवडीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगावात महायुती, काय म्हणाले मंगेश चव्हाण____ पहा व्हिडिओ👇

https://www.facebook.com/share/v/1CPvmLrKTT/

दरम्यान, निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७-अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या फकीर नगमाबी अलीमशाह यांचे पती अलीमशाह उर्फ ‘छोटे सरकार’ यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर तसेच शिवसेनेच्या विकासाभिमुख धोरणावर विश्वास व्यक्त करत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नगरपरिषदेत शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली आहे.

यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत करत, भडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. “भडगावचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा असून, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल,” असे त्यांनी सांगितले.

या प्रवेशप्रसंगी युवराज आबा पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक लखीचंद पाटील, रावसाहेब पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राजकीय घडामोडीमुळे भडगाव नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट) ची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या….

🚨जळगाव ब्रेकिंग: भाजपा ५७ च्या खाली, सेना २५ नक्की मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काय?

🚨 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवनिर्वाचित पाचोरा भडगाव नगराध्यक्षांचा सत्कार, दिला विकासाचा शब्द…

शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button