💐 मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स” यांच्या शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा शहरातील प्रसिद्ध सुवर्णपेढी “मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स” यांच्या भव्य शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवारी एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ‘हास्यजत्रा’ फेम आणि खानदेशचा सुपुत्र शाम सुंदर राजपूत यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी शोरूमचे संस्थापक मुरलीधर अभिमान शेठ सराफ, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे संचालक संजय वाघ, तालुका ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष बापू सोनार, संचालक रवींद्र मुरलीधर सराफ, संचालक मयूर सराफ आदी मान्यवर उपस्थित होते.
स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना होणार फायदा…
कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स यांच्या वतीने १५ गरजू शाळकरी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेत ये-जा करताना अडचणींना सामोरे जाणाऱ्या या विद्यार्थिनींसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
सायकल मिळालेल्या विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “दररोज शाळेत जाण्यासाठी अंतर मोठे असल्याने अनेक वेळा अडचणी यायच्या. आता सायकलमुळे वेळ वाचेल, थकवा कमी होईल आणि अभ्यासासाठी अधिक वेळ मिळेल.” उपस्थित शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
उपस्थित मान्यवरांनी स्तुत्य उपक्रमाचे केले कौतुक…
हास्यजत्रा फेम शाम सुंदर राजपूत यांनी या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक करत सराफ कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “व्यवसायासोबत समाजकारणाचीही जाण असणाऱ्या लोकांमुळेच समाजात सकारात्मक बदल घडतो.”
आमदार किशोर आप्पा पाटील यांनीही सुवर्णपेढीच्या दीर्घकाळापासून चालत असलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले की, “सराफ कुटुंबाने सामाजिक जबाबदारीची परंपरा जोपासली आहे. व्यवसायासोबत समाजसेवेला दिलेले महत्त्व हे प्रेरणादायी आहे.” कार्यक्रमास शहरातील नागरिक, सुवर्णपेढीचे ग्राहक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑 जळगावात डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे आंतर महाविद्यालयीन भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन
🛑 ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील ७ हजार लाडक्या बहिणी अपात्र, हे आहेत अपात्रतेचे निकष
🚨 लाडकी बहीण’ योजनेच्या केवायसीचे सर्व्हरच डाउन, ओटीपी येतं नसल्याने लाडक्या बहिणी हैराण…




