स्व. दुर्गेश महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप.

हॅलो जनता प्रतिनिधी : कजगांव
सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत कजगाव येथील माजी सरपंच तथा पत्रकार भानुदास हिलाल महाजन यांच्या दिवंगत पुत्र दुर्गेश महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त रविवार (दि. २ ऑगस्ट) विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कजगाव येथील जिल्हा परिषद वस्ती शाळा, चमकवाडी येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
कार्यक्रमास कजगांवचे उपसरपंच सादिक मन्यार, अखिल भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. बी. बी. भोसले, जिल्हा सचिव दिपक अमृतकर भडगाव तालुकाध्यक्ष निलेश महाले, तालुका सरचिटणीस अशुत्तोषकुमार पाटील, समाज सेवक श्रेयस कासार, नितिन पाटील माजी उपसरपंच शिवप्रसाद भालेराव ज्येष्ठ नागरिक बाळ सोनवणे, एकनाथ भोई, सोपान महाजन, अनिल चौधर यासह पदाधिकारी, पत्रकार बांधव शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक वसंत पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळा, कजगांवचे मुख्याध्यापक सुनील महाजन यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय दुर्गेश महाजन यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांची समाजाला नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत दुर्गेश महाजन यांच्या स्मृतीस हीच खरी आदरांजली असल्याच्या भावना व्यक्त केल्या.



