⁠हॅलो क्राईम

💥 ब्रेकिंग : विजेचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू अन् सासरच्यांनी काढली कणकीच्या बाहुलीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, भुसावळमध्ये नेमके काय सुरू आहे.

हॅलो जनता न्यूज, जळगाव – भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. २५ वर्षीय विवाहितेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत विवाहितेचे नाव दिपाली चेतन तायडे असे असून ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. दिपाली ही घरातील पाण्याची मोटर बंद करत असताना तिला विजेचा तीव्र झटका बसला आणि जागीच तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र या मृत्यूमागे काही तरी संशयास्पद घडल्याचा आरोप करत दिपालीच्या माहेरच्यांनी घातपात झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

भुसावळ : मृतदेहावर माहेरी अंत्यसंस्कार

दिपालीच्या मृत्यूनंतर तिच्या सासरच्या लोकांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली होती. मात्र माहेरच्या नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह माहेरी नेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला भावनिक पार्श्वभूमी लाभली असून, माहेरच्यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आपल्या गावी म्हणजे माहेरीच केले.

भुसावळ : सासरच्यांकडून प्रतिकात्मक अंत्यसंस्कार

माहेरच्यांनी मृतदेह नेल्यानंतर सासरच्यांनी आपल्या गावात कणकीच्या बाहुलीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळे गावात उलटसुलट चर्चा सुरू असून, सामाजिक आणि कौटुंबिक तणावाच्या पार्श्वभूमीवर या मृत्यूकडे पाहिले जात आहे.

भुसावळ : पोलीस तपास सुरू

या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून झाली असली तरी, माहेरच्यांनी केलेल्या घातपाताच्या आरोपामुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. सविस्तर तपास सुरू असून मृत्यूमागील नेमकी कारणमीमांसा लवकरच उघड होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. ही घटना केवळ एक अपघात आहे की योजनाबद्ध काहीतरी?, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र एक तरुणीची जीवितहानी आणि नंतर घडलेली प्रतिकात्मक अंत्यसंस्काराची घटना गावात चर्चेचा विषय बनली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या….

💥 ब्रेकिंग : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली कृषी सेवा केंद्रांची पाहणी, तपासाला खतांचा साठा..

💥 ब्रेकिंग : रेल्वेने प्रवास करताय मग ही बातमी वाचा, भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वेंच्या मार्गात बदल

💥 ब्रेकिंग : चाळीसगावात सापडले कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज, महामार्ग पोलिसांची मोठी कारवाई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button