🚨 ब्रेकिंग : जळगावमध्ये माघार घेण्यासाठी उमेदवारांचे अपहरण अन् दबाव… संजय राऊत यांचा आरोप

जळगाव : संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ…
संजय राऊत म्हणाले की, जळगावमध्ये लोकशाहीची गळचेपी सुरू असून, निवडणूक प्रक्रियेवर थेट गुंडगिरी आणि दबावाचे सावट आहे. काही ठिकाणी उमेदवारांना धमकावणे, अपहरणासारखे प्रकार घडवून आणणे आणि त्यानंतर माघार घेण्यासाठी भाग पाडणे, हे अत्यंत गंभीर आहे. “लोकशाहीत निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. मात्र तो हक्क हिसकावून घेतला जात असेल, तर ही बाब केवळ स्थानिक नव्हे तर राज्यस्तरीय चिंतेची आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
इतके गंभीर आरोप होत असताना आयोग गप्प बसलेला दिसतो. “निवडणूक आयोगाची निष्क्रियता आश्चर्यकारक आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी आहेत, तेथील निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) यांची थेट जबाबदारी ठरते. त्यामुळे संबंधित आरओंवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : एक निष्ठावंत शिवसैनिक ते नगरसेवक, संदीप राजे यांच्या राजकीय प्रवासावर विशेष लेख…
🚨 ब्रेकिंग : शिंदे सेनेचे नगरसेवक लखीचंद पाटील यांची भडगाव नगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड….




