Rakshatai Khadse : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचा क्लस्टर विकास कार्यक्रम; जळगाव पायलट प्रकल्पासाठी निवडले – केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे
हॅलो जनता, जळगाव : Rakshatai Khadse
भारताच्या फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने (NHB) क्लस्टर विकास कार्यक्रम (CDP) अंतर्गत ५३ फलोत्पादन क्लस्टर विकसित करण्याची योजना आहे. उत्पादन क्षमता वाढवणे, पश्चात-हानी व्यवस्थापन सुधारणे, आणि मूल्यवर्धनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या ५३ क्लस्टरपैकी जळगाव पायलट प्रकल्पासाठी निवडले गेले आहे. जळगावची फलोत्पादन विकासातील क्षमता आणि वेळोवेळी केलेला पाठपुरावा व प्रयत्नांमुळे ही निवड शक्य झाली आहे.
जळगांव जिल्ह्यामध्ये मुख्य पिक म्हणून केळीची शेती केली जाते आणि रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये केळी मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. केळी उत्पादनाच्या बाबतीत हा रावेर लोकसभा मतदारसंघ देशातील सर्वात मोठा पुरवठादार आहे. तसेच, रावेर लोकसभा मतदारसंघातील केळीची मागणी शेजारील देशांमध्ये जसे की इराण, इराक, अफगाणिस्तान, दुबई, बहरीन, अझरबैजान आणि कुवैतमध्ये वाढत आहे. परिणामी, या देशांमध्ये केळीचा नियमित निर्यात व्यापार स्थापन झाला असून, सध्याच्या परिस्थितीत तो आणखी वाढत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे (Rakshatai Khadse) म्हणाल्या.
रक्षाताई खडसे पुढे म्हणाल्या की, क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब, पायाभूत सुविधा उभारणी, आणि शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. जळगाव येथील पायलट प्रकल्प इतर क्लस्टरसाठी एक आदर्श ठरेल आणि फलोत्पादन क्षेत्रातील शाश्वत उपायांचा आदर्श निर्माण करेल.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि भारताला फलोत्पादन उत्पादनांच्या जागतिक निर्यातीत अग्रणी बनवण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य होईल. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ व स्थानिक प्रशासन या प्रकल्पाच्या यशासाठी एकत्रित प्रयत्न करतील आणि जळगावला फलोत्पादन क्षेत्रातील प्रगतीचे एक उज्ज्वल उदाहरण बनवतील.
Rajumama bhole : मुख्य सूत्रधार अद्याप फरार, आमदार भोळेंची पोलिसांवर कारवाईची मागणी”
Swadhar Yojana : स्वाधार योजनेसाठी अर्जाची अंतिम संधी – ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!