🚨 ब्रेकिंग : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सोन्या-चांदीच्या घोडदौडीला अखेर ऐन दिवाळीत ब्रेक लागला आहे. जळगाव सराफा बाजारात वसुबारसनंतरच्या सात दिवसांत सोने तब्बल ८ हजार २३६ रुपयांनी, तर चांदी २३ हजार ६९० रुपयांनी घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
धनत्रयोदशीपासून दरांमध्ये घसरणीची लाट सुरू झाली असून, २४ ऑक्टोबरपर्यंत सोने १,२६,९०० रुपये तोळा, तर चांदी १,५६,५६० रुपये किलो दरावर स्थिरावली आहे. वसुबारसच्या दिवशी सोने सर्वकालीन उच्चांक गाठत १,३५,१३६ रुपये तोळा दरावर पोहोचले होते, तर चांदीने १५ ऑक्टोबरला १,९०,५५० रुपये किलो या विक्रमी दराला स्पर्श केला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींचा यावर थेट परिणाम झाल्याचे तज्ञांचे मत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या येत्या बैठकीमुळे टेरिफ वॉर संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच वृत्तामुळे वायदा बाजारात मोठ्या प्रमाणावर नफेखोरी (profit booking) सुरू असून, त्यामुळेच सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय सोन्या-चांदी बाजाराचे अभ्यासक आदित्य नवलखा यांनी सांगितले की, “ही घसरण तात्पुरती असून, आगामी लग्नसराईत पुन्हा दर वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आताही गुंतवणूक करणे योग्य ठरेल.”
👉 सध्याचे दर (२४ ऑक्टोबर २०२५)
💰 सोने: ₹१,२६,९०० प्रति तोळा
🪙 चांदी: ₹१,५६,५६० प्रति किलो
📉 सात दिवसांत घट:
सोने: ₹८,२३६ नी स्वस्त
चांदी: ₹२३,६९० नी स्वस्त
इतर महत्वाच्या बातम्या…
आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत..
🛑ब्रेकिंग: छत्तीसगड मध्ये गुन्हा पाचोरा पोलिसांची अटक, नेमके काय आहे प्रकरण…
🛑ब्रेकिंग: टोणगाव शिवारातील वृक्षतोडीवर कादिर खान यांचा खुलासा, “सर्व परवानग्या कायदेशीरपणे घेतल्या”



