💥 ब्रेकिंग : पेट्रोल भरताना काळजी घ्या अन्यथा… तुमची होऊ शकते फसवणूक…
हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – पेट्रोल पंपावर होणाऱ्या इंधन चोरीबद्दल तुम्ही ऐकले असेल. त्याविषयीचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे अनेक जण मीटर शून्य झाले का हे बघतात. तरीदेखील वाहनधारकांनी खबरदारी घेतली पाहिजे. त्याविषयी जाणून घेऊया.

राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरू नका :
१००, २०० किंवा ५०० रुपयांसारख्या आकड्यांमध्ये पेट्रोल भरणे टाळा. काही पंपांवर मशीनमध्ये छेडछाड करून अशा आकड्यांवर ग्राहकांची फसवणूक केली जाऊ शकते. अशावेळी तुम्हाला पैशांप्रमाणे थोडे कमी इंधन मिळू शकते. मात्र ते लक्षात येत नाही. यामध्ये तुम्ही पैशांऐवजी लिटरमध्ये पेट्रोल मागावे, शंभर दोनशे रुपयांचे पेट्रोल म्हणण्याऐवजी एक लिटर, दोन लिटर पेट्रोल भरा असे सांगावे.
पेट्रोल भरताना डिजिटल मीटर आवश्यक :
डिजिटल मीटर असलेला पंप निवडा. याच पंपावर पेट्रोल भरून घ्या. जुन्या मशीनमध्ये बिघाड होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यात छेडछाड करणे सोपे असते. जर त्या मशीनचे योग्य प्रकारे मेंटेनन्स झाले नसेल तर ग्राहकांना कमी इंधन मिळण्याचा धोका जास्त असतो.
पेट्रोल भरताना मीटरमध्ये शून्य बघावे :
पेट्रोल भरण्यापूर्वी मशीन शून्यावर सेट केली गेली आहे की नाही, हे बघावे. फक्त कर्मचाऱ्याच्या सांगण्यावर अवलंबून राहू नका. शून्य बघणे महत्त्वाचे आहे
पेट्रोल भरताना डिजिटल पेमेंट वापर करा :
कॅशऐवजी शक्यतो यूपीआय किंवा कार्डने पैसे द्या. यात व्यवहारिक आणि डिजिटल रेकॉर्ड राहतो. त्यामुळे पुढे वाद निर्माण झाल्यास तुम्ही किती रुपयांचे किंवा किती लिटर इंधन टाकले आहे याचा पुरावा सोबत राहतो.
प्रत्येक पेट्रोल पंप फसवणूक करत नाही प्रत्येक पेट्रोल पंप फसवणूक करत नाही. पण ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींमुळे अनेक पंपांविरुद्ध कारवाईही झाली आहे. त्यामुळे पंपावरील कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवतानाही थोडी सावधानता बाळगावी.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥 ब्रेकिंग : बोदवडकरांचा पाणी प्रश्न मिटणार, पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न
💥 ब्रेकिंग : विद्यापीठात उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन




