धक्कादायक : सावद्यात अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी केला अत्याचार..
हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यात महिला अत्याचारांच्या घटना सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. सावदा येथील एका गावात अल्पवयीन मुलीस तीन मुलांनी ओळखीचा फायदा घेत फूस लावून आळीपाळीने शारिरीक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्थानकात तिघांविरोधात अत्याचार व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील सावदा येथील एका अल्पवयीन मुलीवर ओळखीचा फायदा घेत तीन जणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार घडल्यानंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलिस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, पोलिस उपनिरिक्षक अमोल गर्जे यांनी पोलिस पथकाच्या साहाय्याने त्वरित तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन तासाच्या आत २ संशयित आरोपींना व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
त्यांच्यावर सिआर नं.१७३/२०२४, कलम ७०(२)७५(१)(१),३,(५) व बाल लैंगिक संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४,८,१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात असून प्राथमिक तपास करून संशयित अल्पवयीन आरोपीला बालन्यायालय व इतर दोन संशयित आरोपींना सत्र न्यायालयात हजर करत पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पाचोऱ्यात बेमुदत संप, आमदार किशोर पाटील यांनी घेतली कर्मचाऱ्यांची भेट
विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात फळ वाटप
जामनेर मध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक करत गुन्हा दखल….