लोकसभेप्रमाणे विधानसभेत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहील – रोहिणी खडसे
हॅलो जनता, प्रतिनिधी (मुक्ताईनगर)
महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच आज मुक्ताईनगर येथील एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या घरी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या घराबाहेर कार्यर्कत्यांनी घोषणाबजी करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आज निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
मला विश्वास आहे की, ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत जनतेने महविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता त्याच पद्धतीने आता विधानसभा निवडणुकीत देखील कौल देईल. तसेच त्यांना एक टप्प्यात निवडणूक सोपी वाटत असेल म्हणून कदाचित एक टप्प्यात निवडणूक घेत असतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या…