Headlines

धरणगावात बंद घर फोडून चोरी, गुन्हा दाखल !

बंद घर फोडून चोरी

धरणगाव (प्रतिनिधी) येथील चिंतामण मोरया परिसरातील स्वामी समर्थ नगरातील आनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच. चौधरी यांचे बंद घर फोडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील स्वामी समर्थ नगरातील आनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच. चौधरी हे बाहेरगावी गेले होते त्यांचे रात्रीच्या वेळेस बंद घर फोडले मुख्याध्यापकांचे घरातील रोख २२ हजार रुपये व १२ ग्रॅमच्या साखळ्या कानातील टोंगल, अंगठी, गणपती मूर्ती कुलदेवताची मूर्ती असा एकूण एक लाख ७५ हजार रुपये ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला खबर आर. एच. चौधरी यांनी दिल्यावरून धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे. श्वानपथक मागवून तपासणी करण्यात आली. घर फोडल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील सामान अस्तव्यस्त रोकडसह सोनेच फोडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चिंतामण मोरया परिसरात व स्वामी समर्थ नगर येथे चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी देखील होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टिका, ईडी चौकशीची मागणी

India Vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना सुरू ; भारतासमोर 249 धावांचं आव्हान !

Raver : शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ३ लाखांची चोरी ; गुन्हा दाखल !

7,921Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION