हॅलो सामाजिक

जो पर्यंत पत्रकारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत मी आणि माझा पत्रकार संघ स्वस्त बसणार नाही – प्रवीण सपकाळे

हॅलो जनता, न्युज – जळगाव

महाराष्ट्र पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग जळगाव तर्फे आयोजित जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार सह हेल्मेटचे वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्री. सपकाळे म्हणाले की, राज्यातील सर्व भागात काम करणाऱ्या पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी भव्य संवाद यात्रा काढण्यात आली.

या संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील प्रत्येक तालुक्यात जाऊन त्या भागातील पत्रकारांच्या समस्या सरकार आणि प्रशासनाकडे मांडण्याचे आणि ते सोडवण्याचे काम पत्रकार संघाच्या माध्यमातून झाले. संवाद यात्रेच्या माध्यमातून मांडलेले अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे मात्र अजून देखील पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जोपर्यंत हे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी आणि माझा पत्रकार संघ स्वस्त बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजय आवटे प्रमुख अतिथी म्हणून मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी अनिल जोशी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा दूध सघाचे सदस्य अरविंद देशमुख, सकाळचे सचिन जोशी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या……

Dharangaon : धरणगावातील शेतकऱ्याची या कारणामुळे आत्महत्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

Chhattisgarh : छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला: IED स्फोटात 9 जवान शहीद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button