हॅलो राजकारण

जळगावात भाजपकडून विधानपरिषदेसाठी अमोल शिंदे यांचे नाव चर्चेत, लवकरच मोठी बातमी मिळणार…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उमेदवारीसाठी जोरदार चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः पाचोरा विधानसभा क्षेत्रातील राजकारण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

Video : पाचोरा पोलिस ॲक्शन मोडवर, दारूड्यावर मोठी कारवाई…

व्हिडिओ लिंक____👇

https://www.facebook.com/share/v/1HSSDg3UGg

पाचोरा विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल शिंदे यांचे नाव विधान परिषदेसाठी आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षातील विश्वासू आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ ते भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे पक्षाकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप अमोल dhinde
भाजप अमोल शिंदे

दरम्यान, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक म्हणूनही अमोल शिंदे यांची ओळख आहे. महाजन यांच्या गटातील त्यांचा प्रभाव आणि संघटनातील काम पाहता त्यांचे नाव अधिक बळकट होत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पाचोऱ्याला आणखी एक आमदार (विधान परिषद सदस्य) मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपकडून उमेदवारीसाठी नंदू महाजन, नंदकुमार अडवाणी आणि अमोल शिंदे या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल शिंदे यांचे पारडे सध्या जड असल्याचे संकेत मिळत आहेत.

भाजप : अमोल शिंदे यांच्या संघटनात्मक कामामुळे संधी मिळण्याची शक्यता…

अमोल शिंदे यांनी संघटन विस्तार, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर केलेले काम यामुळे त्यांना पक्षात मजबूत स्थान निर्माण करता आले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्व त्यांना विधान परिषदेसाठी संधी देण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी पुढील काही दिवसांत भाजपकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असून त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या….

भडगावात शिवसेनेची ताकद वाढली; भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात भव्य प्रवेश.

साप्ताहिक हॅलो जनता दि. १४ एप्रिल २०२६

चोपडा ब्रेकिंग : गो तस्करांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अन्यथा, रोहित निकमांचा इशारा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button