पुरणपोळीसह धान्याची रास खाऊ घालत सर्जाराजाप्रती कृतज्ञता, गोदावरी कुटूंबियांतर्फे बैल पोळा सण उत्साहात साजरा
हॅलो जनता, जळगाव – शेतामध्ये वर्षभर राबणार्या सर्जाराजाप्रती कृतज्ञता व्यक्ता करणारा सण म्हणजे पोळा.. पोळ्यानिमित्त आज डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात सर्जाराजाचे पूजन करुन त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी पशुपालक असलेल्या शेतकर्यांचा सत्कार माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. वर्षभर शेतात काम करणार्या बळीराजाचाही टोपी, पंचा घालून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी आजी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, अनिल व अलका पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ वैभव पाटील, सदस्या डॉ केतकीताई पाटील, चिमुकल्या किवा व सारा पाटील, दिल्ली येथून आलेले आयकर विभागाच्या माजी आयुक्त पोमेेला बालीप्रसाद, परमजित सिंग, किशन, कृषी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ एस एम पाटील, प्राचार्य डॉ अशोक चौधरी, डॉ शैलेश तायडे, प्रा सतीश सावके, भरत पाटील, नाना सावके यांच्यासह गोदावरी परिवारातील सहकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या…
शेतकऱ्यासाठी बैलच ठरला ‘काळ’, पोळ्याची तयारी करताना बैल उधळला
पाचोरा शहरात महाविकास आघाडीचे उद्या जोडे मारो आंदोलन
बांगलादेशात हिंदुंवर अत्याचार सुरूच, समोर आली धक्कादायक माहिती….