Unmesha Patil : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या भगव्या सप्ताहास जोरदार प्रतिसाद
हॅलो जनता, चाळीसगाव – (Unmesha Patil) रयतेचे राज्य व्हावे यासाठी भगवा खांद्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. याच विचाराने भगवा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. या प्रेरणेने भगवा घेऊन आम्ही शिवसैनिक गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधत आहोत. तालुक्यातील जनता लहान लहान समस्यांनी त्रस्त आहे. मात्र लोकप्रतिनिधी जमिनीवर न राहता जमिनी घेण्यात व्यस्त आहे. उदासीन लोकप्रतिनिधी आणि निगरगट्ट महायुती सरकार या जात्यात जनता भरडली जात आहे. या सर्व जनतेला घेऊन शिवसेना लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहे. अशी गर्जना शिवसेनेचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील (Unmesha Patil) यांनी केली आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गोरखपूर येथील शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेंद्रबापू पाटील, तालुका प्रमुख रमेशआबा चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव नाना खलाणे, बेलगंगा संचालक बाळासाहेब पाटील हिंगोणेकर,तालुका संघटक सुनील गायकवाड, तालुका प्रवक्ते संदीप घोरपडे, तालुका प्रमुख सविताताई कुमावत, आदी मान्यवर उपस्थित होते.
Ajeet Pawar : विधानसभा निवडणुकीत ठरलं, हा आहे अजित पवार गटाचा “मेगा प्लॅन”
Birth- Death Certificate : सर्व्हर डाऊन मुळे जन्म मृत्यूच्या दाखल्यांसाठी नातेवाईकांच्या हेलपाट्या