Headlines

बदामी (कर्नाटक) येथे राष्ट्रीय महासंमेलन उत्साहात संपन्न

भडगाव : बदामी (कर्नाटक) येथे राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठान, भारत यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय महासंमेलन दिनांक २५ व २६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले. देशभरातून मोठ्या संख्येने बांधव, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. या महासंमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत सरदार मा. सत्यजित दादा पाटणकर होते,…

Read Full News

भडगाव उपबाजारात शेतमालाच्या लिलावाला सुरुवात ; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील. भडगाव : पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा-भडगाव यांच्या उपबाजार भडगाव येथील आवारात यंदाच्या नव्या खरीप हंगामातील शेतमालाच्या आवक वाढल्याने जाहीर लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मका, ज्वारी, हरभरा, गहू आदी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक भडगाव उपबाजारात होत…

Read Full News

भडगावात गुन्हेगारीचे साम्राज्य ! अवैध धंद्यांचा कळस ; नागरिक संतप्त.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : शहर व तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून अवैध धंद्यांनी अक्षरशः मोकाट धाव घेतल्याचे चित्र आहे. दारू, मटका, जुगार आणि अमली पदार्थ विक्रीसारखे प्रकार उघडपणे सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर…

Read Full News

भडगावात शिवसेनेची ताकद वाढली; भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात भव्य प्रवेश.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून शिवसेना (शिंदे गट) दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपाचे वाल्मीक पवार, विश्वनाथ भोई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. हा पक्षप्रवेश सोहळा कार्यसम्राट…

Read Full News

भडगाव : ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची २४ तासांपासून रांग; शेतकऱ्याला आली भोवळ.

भडगाव प्रतिनिधी यशकुमार पाटील  हॅलो जनता न्यूज, : एकीकडे देश डिजिटल युगात झपाट्याने प्रगती करत असताना, दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांना आपले धान्य विकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. भडगाव शेतकी संघाच्या भोंगळ नियोजनामुळे ज्वारी खरेदीसाठी टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल २४ तासांहून अधिक काळ रांगेत उभे राहावे लागले. भडगाव तालुक्यातील…

Read Full News

जागतिक महिला दिनी भडगाव येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने HPV लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रथम लाभार्थी म्हणून कु. दिक्षा तांबटकर हिला HPV लस देण्यात…

Read Full News

दोन मुलांना वाचवताना युवक व महिलेचा बुडून मृत्यू; भडगाव शहरात शोककळा.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील गिरणा नदी पात्रात दोन लहान मुलांना वाचवताना एका युवकासह महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. ८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आझाद चौक ते पेठ भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा…

Read Full News

भडगावच्या खालची पेठ येथे वारकरी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : शहरातील खालची पेठ येथे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार संत तुकाराम महाराज बीज च्या पर्वकाळात वारकरी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची सुरुवात फाल्गुन पौर्णिमा ५ मार्च २०२६, गुरुवार रोजी होणार असून समारोप १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी होणार आहे. यंदा या कीर्तन सप्ताहाचे…

Read Full News

भडगाव तहसीलसमोर ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण; १५ व्या वित्त आयोगातील कामांची चौकशीची मागणी

भडगाव : तालुक्यातील वडगाव नालबंदी येथील ग्रामस्थांनी विविध संघटनांच्या पाठिंब्याने भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत २०२१ ते २०२५ या कालावधीत ग्रामपंचायत मार्फत १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची सखोल चौकशी करण्याची ठाम मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या मते, संबंधित कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय आहे. बेकायदेशीर शिपाई भरती, हौद…

Read Full News

महिला सुरक्षा, बंधुता आणि सौहार्दाचा संदेश देणारी होळी ; गुढे गावाचा आदर्श उपक्रम

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  गुढे/भडगाव : होळी सण म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगल्या संस्कारांचा विजय, असा संदेश देत गुढे गावातील गिरणाई गणेश मित्र मंडळ तर्फे यावर्षी “वाईट विचारांचे दहन होळी” हा सामाजिक उपक्रम उत्साहात व जागरूकतेच्या वातावरणात पार पडला. पारंपरिक होळी दहनाला सामाजिक आशयाची जोड देत मंडळाने समाजातील अपप्रवृत्ती आणि घातक कृत्यांविरोधात ठाम…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION