हॅलो राजकारण

💥 ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा तहसीलदारांनी नव्या दालनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. पाचोरा तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतातून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

आमदार किशोर पाटील म्हणाले की, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना दररोज असंख्य खटल्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही पार पाडावी लागते. अशा परिस्थितीत कार्यालयीन वातावरण चांगले असेल तर अधिकाऱ्यांचा काम करण्याचा उत्साह वाढतो आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतो. “अधिकाऱ्यांच्या डोक्यावर काटेरी मुकुट असतो, तरीदेखील ते जनतेसाठी कार्य करत राहतात. या दालनाच्या माध्यमातूनही सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम अधिक प्रभावीपणे व्हावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी अनुदान घोटाळा अन् आमदारांनी केले तहसीलदारांचे कौतुक…

ते पुढे म्हणाले की, “११ वर्षे आमदारकी करताना मला सर्व शासकीय अधिकाऱ्यांचा उत्तम सहकार्याचा अनुभव आला. शेतकऱ्यांना सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खरी मदत देण्याचे काम अधिकारी करत आहेत. काही वेळा पाचोऱ्यात काही घडामोडींमुळे डाग लागल्याचे काम झाले, मात्र तहसीलदारांनी तत्काळ कारवाई करून योग्य संदेश दिला. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”

ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत...
ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत…

तहसीलदार विजय बनसोडे यांनी सांगितले की, “गेल्या वर्षभरापासून पाचोऱ्यात येऊन शासकीय कार्यालयाच्या बैठकींसाठी जागा अपुरी पडत होती. मात्र आमदार किशोर पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवून दिली. त्यामुळे हे नवीन दालन उभारणे शक्य झाले.”

प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात चांगले संबंध राहिले तर विकासकामे गतीने होतात. जेव्हा अडचणी आल्या, तेव्हा आमदार पाटील आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे प्रशासनाला काम करताना बळ मिळते.”

या कार्यक्रमाला प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश देवरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दालनाच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयीन कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडून सर्वसामान्य जनतेला न्याय देतील, अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात ठाकरेंची सेना डॅमेज कंट्रोल करणार, आगामी निवडणुकांची रणनीती ठरली….

💥 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यात नेमके काय घडलं?

🛑 ब्रेकिंग: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; माजी पंचायत समिती सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button