Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरण ; सीआयडीचे तीन लोकांना समन्स
वाल्मीक कराड यांचीही चौकशी
हॅलो जनता न्युज, बीड
दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात फरार असलेल्या वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या यांचा परस्पर संबंध असल्याने सीआयडी या दोन्ही घटनांचा एकत्रित तपास करत आहे. या संदर्भात सीआयडीने तिघा व्यक्तींना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सीआयडी अधिकाऱ्याने सांगितले की, खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जवळचा संबंध आहे. यामुळे चौकशीसाठी तीन व्यक्तींना समन्स बजावले असून, त्यांच्या नावांची माहिती अधिकृतपणे उघड करण्यात आलेली नाही.
या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले अद्याप फरार आहे. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या सूचनेनुसार काम करत होता. त्यामुळे वाल्मीक कराडची चौकशी आवश्यक मानली जात आहे. बुधवारी (१ जानेवारी) सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कराडची चौकशी केली.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. दोन कोटींच्या खंडणीला विरोध केल्यामुळे हा वाद उफाळला होता.
या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आलेली आहे. वाल्मीक कराडचा यात सहभाग असल्याचे आरोप केले जात आहेत, मात्र त्याला केवळ खंडणी प्रकरणात अटक करण्यात आले आहे.
Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक
Beed : “सरपंच हत्या प्रकरण : फरार आरोपींना अटक नाही तर महाराष्ट्र बंद – मनोज जरांगे यांचा इशारा