Anjali Damaniya : अंजली दमानियांचे डॉ. अशोक थोरात आणि वाल्मिक कराडविरोधात खळबळजनक आरोप

हॅलो जनता न्यूज, मुंबई :
“धनंजय मुंडेंच्या आणि वाल्मिक कराडच्या कृपेने त्यांची बदली पुन्हा बीडमध्ये झाली. काल आम्हाला त्यांच्या एका मोठ्या हॉटेलबद्दल माहिती मिळाली आणि ते हॉटेल अंबेजोगाईला असून, ते लक्झरी हॉटेल आहे. ते पाहून थोडा धक्का बसला,” असं समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या. त्या डॉ. अशोक थोरात यांच्याबद्दल बोलत होत्या, ज्यांनी संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट दिला होता. तसेच, बोललं जातंय की, वाल्मिक कराडवरही डॉ. अशोक थोरात यांनी उपचार केले.
अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी डॉ. अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “जर ही व्यक्ती संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टची सर्व डिटेल्स देणार असेल, तर त्यांची योग्य कारवाई केली का, याबद्दल शंका येते. कारण हे सर्व भ्रष्ट लोक पैशासाठी काहीही करतात,” असं दमानिया म्हणाल्या.
“चौकशी केली तर अनेक गोष्टी समोर येतील. त्यांच्या दोन जोडपत्रांचा तपास केला आहे. पहिल्या जोडपत्रात बारा गंभीर आरोप आहेत, त्यात कोविड काळात आठ कोटी, दोन कोटी, एक कोटी असे आरोप आहेत. दुसऱ्या जोडपत्रातही २४ आरोप आहेत, जे अजून प्रलंबित आहेत,” असं दमानिया पुढे म्हणाल्या.
अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी अशोक थोरात यांच्यावर आणखी आरोप केले. “अशोक थोरात यांनी दोन वेळा वीआरएसची मागणी केली होती. मात्र, शासनाने ती रिजेक्ट केली कारण त्यांच्यावर इतके मोठे आरोप आहेत. हे पेंडिंग आरोप असताना, त्यांना वीआरएस देण्याची परवानगी मिळाली नाही,” असं त्या म्हणाल्या.
“अशा व्यक्ती बीडमध्ये असतील, तर वाल्मिक कराडला आरामात ठेवणं शक्य होतं. पहिल्यांदा तो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला होता, पण त्याची बेसिक तपासणी करून तिथून पाठवण्यात आले. दुसऱ्या वेळी तिथे आणलं गेलं, काहीही गरज नव्हती तरी त्याला तिथे ठेवलं, आणि मग आम्ही ओरडल्यावर त्याला तिथून हलवण्यात आलं,” असं दमानिया म्हणाल्या.
श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा
तायक्वांडोपटू पुष्पक रमेश महाजन “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित
ब्रेकिंग : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली, खोकल्याचा त्रास वाढला…