🚨 ब्रेकिंग: पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांचा आक्रोश, चुकीच्या पंचनाम्यांमुळे अनुदानापासून हजारो शेतकरी वंचित
हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागले असताना, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या पंचनाम्यांमुळे हजारो शेतकऱ्यांना योग्य अनुदान मिळालेले नाही. काही ठिकाणी तर बागायती जमिनींचे जिरायत म्हणून पंचनामे करण्यात आल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या वास्तविक नुकसानीपेक्षा अतिशय कमी प्रमाणात मदत मिळाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या अन्यायाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी…
